माजी आमदार दिपकआबांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी विकासाच्या जोरावर निवडणुकीत रणशिंग फुंकले आहे. तर राज्यातील महायुतीचे घटक पक्षाचे दुसरे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हेही कंबर कसून आता नाही तर परत कधीच नाही असे समजून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर तालुक्यातील दिवंगत आ गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख या दोन नेत्यांत उमेदवारीवरून अजूनतरी एकमत न झाल्याने शेकाप कार्यकर्त्याची घालमेल वाढली आहे.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याकडे सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची तगडी फौज आहे. तालुक्यातील कोणताही साधा कार्यकर्ता रात्री-अपरात्री त्यांच्याशी फोन करून संपर्क साधू शकतो. त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची रीघ लागलेली दिसून येते. आपल्या हक्काचा एकमेव नेता अशी धारणा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची झाली आहे. दीपकआवांनी विधानपरिषद सदस्य असताना अनेक कार्यकर्ते जोडले असून विकासकामेही मोठ्या प्रमाणात केली आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दीपक आबांनी ग्रामीण भागात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही.

त्यामुळे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर पक्षाने तिकीट दिल्यास विधानसमेसाठी निवडणूक लढविणार असल्याचे ते सांगतात. सांगोला येथे नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाच्या मेळाव्यास मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आबा आता माघार नाही अशी साद घातल्याने दीपक आबांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव वाड्यावर जाऊन आपला नेता कामदार नेता व हक्काचा माणूस’ म्हणून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आबा आता नाही तर परत कधीच नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी दीपकआबांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.