केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै 2024 मध्ये वाढणारा महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत जून 2024 चा AICPI इंडेक्स नंबर जारी करण्यात आला नाहीय. पण महागाई भत्ता किती वाढेल? याची माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ झालेली दिसू शकते. 3 टक्के वाढ होण्याची 2 वर्षातील ही पहिली वेळ आहे.
गेल्या चारवेळा 4 टक्के इतका महागाई भत्ता वाढला होता. लेबर ब्यूरो महागाई भत्ता ठरवणाऱ्या AICPI इंडेक्सचे मेपर्यंतचे आकडे जारी करण्यात आले आहेत. आतापर्यंत जूनचे नंबर जाहीर होणे बाकी आहे. 31 जुलैला हे आकडे येणार होते.पण यात उशीर झाला. सध्याचे ट्रेण्ड्स पाहिले तर महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता 53 टक्क्यांजवळ पोहोचला आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांच रिव्हिजन दिसतंय. इंडेक्सनुसार मेपर्यंत महागाई भत्ता 52.91 टक्क्यांवर आहे. जूनचे आकडे लवकरच येतील. जूनमध्ये जर इंडेक्स 0.7 अकड्यांनी वाढला तर 53.29 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. 4 टक्के उसळी घेण्यासाठी इंडेक्स 143 आकड्यापर्यंत पोहोचेल, हे अशक्य दिसतंय. इंडेक्समध्ये इतकी मोठी उसळी नाही येणार.
यासाठी कर्मचाऱ्यांना 3 टक्क्यांवर संतुष्ट राहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील पुढचे डिव्हिजन 1 जुलैपासून लागू होईल.याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत होऊ शकते. लेबर ब्युरो आपली आकडेवारी अर्थ मंत्रालयाकडे सोपवेल. यानंतर अर्थ मंत्रालयाच्या शिफारसीवर याला कॅबिनेटमध्ये मंजूरी मिळेल. सर्वसाधारणपणे जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला होऊ शकते. सप्टेंबरमध्ये घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टचे एरिअर मिळेल. तसेच त्याच महिन्यातील पगारदेखील मिळेल.