सतर्कतेचा इशारा! या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’

पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये पुन्हा पावसाचा (Pune Rain) जोर वाढल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी  लावली आहे. तर हवामान विभागाकडून पुण्यासह घाटमाथा परिसराला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज (Pune Rain) वर्तवण्यात आला आहे.

तर, इतर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे अतिवृष्टी देण्याचा  देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. एक ऑगस्टपासून राज्यामध्ये मान्सून वेगाने सक्रिय झाला आहे. पश्चिम बंगाल व झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता पुढील २४ तासांत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी  आहे. कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला.

दरम्यान, आज आणि उद्या (शनिवारी, रविवारी) राज्यभर मुसळधार अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातपावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.