सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचे सत्र कायम सुरू असते. त्यामुळे पर्यटकांसाठी सिंहगड सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन लोणावळा प्रशासनाने धोकादायक पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सिंहगडाचा घाट रस्त्यावरील दरड वन विभागाकडून काढण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे पर्यटकांसाठी सिंहगड सोमवारपर्यंत बंद असणार आहे.
पर्यटकांसाठी सिंहगड सोमवारपर्यंत बंद!
