बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा! परतल्या भारतात…

बांग्लादेशमध्येच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून देशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बांग्लादेशमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे.दरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देशाती सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून हसीना अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले असून शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्या आहेत. निवासस्थान सोडून त्यांनी भारतात आश्रय घेतल्याचं सांगितलं जातंय. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.यानंतर थोड्याच वेळात बांगलादेश लष्करकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.