कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी ही माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेली होती.त्यांच्या या मागणीची दखल घेत या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
या निधीतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बापू रामनगर ते कळंब्याला जोडणारा रस्ता, कळंबा नरके नगर ते पाचगाव रस्ता, वडक शिवाले ते नागाव रस्ता, इतर जिल्हा मार्ग ७६ ते मूडशिंगी गांधीनगर रस्ता, वसगडे सोनार माळ ते नंदीवाले पानंद रस्ता या रस्त्यांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये
तर प्रमुख राज्यमार्ग सहा पासून मौजे वडगाव ते राष्ट्रीय महामार्ग चारला जोडणारा रस्ता आणि मेनन फॅक्टरी ते नागाव रस्त्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.