विधानसभेची खडाजंगी! अकरा विधानसभा मतदारसंघात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारयांचे विशेष लक्ष असलेला जिल्हा आणि राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जात. स्वत: शरद पवारांनी मंत्री झाल्यानंतर याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.तर, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे.

त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांची विशेष मर्जी राहिली आहे. मात्र, 2018 नंतर राज्यातील राजकारण बदललं, मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश, बार्शीच्या सोपल यांनी सोडलेली साथ आणि स्थानिक बदलांमुळे राष्ट्रवादीचा सोलापूरातील बुरज ढासळल्याचं दिसून आलं. जिल्ह्यावर भाजपने (BJP) पकड मजबूत केली. आता, पुन्हा तोच बालेकिल्ला शाबूत करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

मात्र, स्वत:चाच पुतण्या आता शरद पवारांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथेही राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास 11 विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार असल्याचे दिसून येते.