वडापूर बंधारा गेला पाण्याखाली! सध्या वाहतूक बंद

उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने तालुक्यातील सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील वाहतूक सध्या बंद करण्यात आली. उजनी धरणातून काल सायं.5.00 वाजता 1 लाख 25 हजार क्युसेकचा तर वीर धरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

संगम येथून दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. तालुक्यात उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, सिद्धापूर,अरळी, ही गावे भिमेच्या काठावर येत आहेत पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रात असलेल्या मोटारी शेतकऱ्यांनी काढून ठेवल्या.