सोलापुरात शंभरावे नाट्यसंमेलन उद्या सत्तावीस व 28 जानेवारीला सोलापूर मध्ये होणार आहे. आज 26 जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नॉर्थकोट प्रशालेतील भव्य अशा रंगमंचाचे उद्घाटन होणार आहे.
उद्या शनिवार 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत.
अभिनेत्री वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी, निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान यांची मुलाखत दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सिने कलावंतांची कलारंजनी कार्यक्रम होणार आहे.