विष्णू हरिदास भजनावळे, रा. मु.पो. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. भजनावळे हे गुरुवार, दि. 04/07/2024 रोजी नेहमीप्रमाणे म्हशींना चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या त्यामध्ये विजेची तार तुटून पडली होती.सदर ओढ्यामध्ये उतरलेल्या 19 म्हशी पैकी काही म्हशी गाभण होती. त्यांचे गतप्राण झाले आहे. भजनावळे यांची शेती नसून यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशींच्या दुधावर सुरु होता.
त्यांचे अचानक मयत झाल्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. या घटनेची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांना कळाल्यावर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती देवून तातडीने पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले व स्वत: गुळवंची येथे जावून घटनास्थळी भेट देवून भजनावळे यांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी भजनावळे कुटुबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिकरित्या 50 हजार रुपयांचे रोख मदत केली व शासनातर्फें जो पर्यंत भजनावळे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.