सर्वसामान्यांना मोठा दिलासा! 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती होणार स्वस्त…..

सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवरील उपचार स्वस्त होणार आहेत.NPPA ने 70 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात वेदना कमी करण्यासाठी औषधे, म्हणजे वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, ताप, संसर्ग, अतिसार, स्नायू दुखणे, मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि इतर अनेक आजारांवरील औषधांचा समावेश यात आहे.

यापूर्वी जून महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. NPPA ने जूनमध्ये झालेल्या 124 व्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या.

अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमती गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. याशिवाय कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही स्वस्त करण्यात आली.