इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नव्याने वाढले १२ मतदान केंद्रे

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २५४ जुने मतदान केंद्र असून नव्याने १२ केंद्रे वाढले आहेत असे एकूण सध्या २६६ मतदान केंद्रे अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये कोरोची १, खोतवाडी १, कबनूर २, चंदुर १, व इचलकरंजी ८ असे नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. निवडणूक आयोगाने हा मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर स्वतः समक्ष उपस्थित राहून हे कामकाज पूर्ण करणार आहेत.

मतदार नोंदणी मतदार वगळणी व यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्तीसाठी शासनाच्या संकेतस्थळाचा वापर करून घरबसल्याही ही दुरुस्ती किंवा मतदार नोंदणी होऊ शकते. तसेच १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवकांनी मतदान नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही मतदान नोंदणी अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले.