उधारीवर परफ्युम देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन चिडून मेडीकलमधील (Medical shop) शोकेसची काच फोडत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसात ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (वय २८ रा. साईनगर शहापूर) आणि संतोष मारुती देसाई (वय ३२ रा. पाटील मळा शहापूर) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी समीर युनूस सर्जेखान (वय २३ रा. मथुरानगर) याने फिर्याद दिली
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, समीर सर्जेखान याचे साईनगर शहापूर येथे मेडीकल शॉप (Medical shop) आहे. समीर याची संशयित गेजगे व देसाई यांच्याशी तोंडओळख आहे. शुक्रवारी रात्री ओंकार गेजगे व संतोष देसाई हे दोघे मेडीकलमध्ये आले होते. त्यांनी समीर याच्याकडे उधारीवर परफ्युम देण्याची मागणी केली. त्याला समीर याने नकार दिल्याने चिडून जावून गेजगे व देसाई यांनी मेडीकलमधील शोकेसची काच फोडली. तसेच समीर याला जीवे
मारण्याची धमकीही दिली. काच फोडल्याने ४५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.