८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येते. या अनुषंगाने यावर्षी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या सुचनेनुसार प्रामुख्याने महानगरपालिका आरोग्य विभागाकडील महिला सफाई कर्मचारी त्याचबरोबर महानगरपालिकेच्या इतर विभागातील महिला कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या रक्त तपासणी व्हावी यासाठी महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते.
जवळपास ३५० महिला कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, ग्रंथपाल बेबी नदाफ, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, सुजाता दाभोळे आदी उपस्थित होत्या तसेच शिबिरासाठी महिला व बाल विकास विभाग प्रमुख सिमा धुमाळ यांचेसह राजश्री जाधव, वैभव कांबळे, विद्या कुंभार त्याचबरोबर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील तेजस सुतार, स्नेहल जाधव, सचिन लोले, प्रिती पाटील, जस्मिन मुजावर, सुनिता ऐवळे, स्नेहल गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी डॉ. यासीन पठाण, डॉ.मिनल पडीया, डॉ. शोभा लांडे, डॉ.वैभव साळे यांनी महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासणी केली