महायुतीकडून उमेदवारी मिळो वा ना मिळो अपक्ष निवडणूक लढवणार – आमदार प्रकाश आवाडे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपापल्या परीने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. परंतु कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला होता. पण सध्या आता महायुतीचे सरकार असल्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला तिकीट मिळणार? कोण बाजी मारणार? हे आता येणारा काळ ठरवेल. माझा विश्वास मा. देवेंद्र फडणवीस, मा.एकनाथ शिंदे, मा.अजित पवारांवर आहे मी प्रकाश आवाडे किंवा माझे पुत्र राहुल आवाडे आम्ही आमचे उमेदवारी मागणार आहोत.

लोकसभेला आम्ही ताराराणी पक्षातर्फे 40000 लीड देऊन खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणले त्यामुळे विधानसभेला आम्हालाच महायुतीकडून लढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपाकडून माजी आमदार सुरेश साळवणकरही इच्छुक आहेत तर तो त्यांचा प्रश्न आहे. महायुतीने आम्हाला जर तिकीट नाही दिलं तर आम्ही अपक्ष लढू तसेच शहरातील भाजप व ताराराणी आवाडे गट कधीही आजपर्यंत एकत्र आले नाहीत व भाजपाने देखील आम्हाला आपले मानले नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून लढू असा आत्मविश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला.