इचलकरंजी येथे दुचाकी, चारचाकी व ट्रकला धडक जीवीतहानी नाही; वाहनांचे मोठे नुकसान

सुतबाचकी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीस्वार महिलेसह चार चाकी वाहनाला तसेच ट्रकला धडक दिली. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले. सदरचा अपघात भोने माळ परिसरात बुधवारी सायंकाळी झाला. या अपघाता बाबत रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

जवाहरनगर येथून तामिळनाडू येथून सुताची बाचकी घेवून रामचंद्र सेल्वन हा १४ चाकी ट्रक घेवून आला होता. सूत उतरवल्यानंतर ट्रक राजर्षी शाहू महाराज पुतळा ते अटल बिहारी वाजपेयी चौकाकडे निघाला होता. यावेळी ट्रक चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रकची जवळून जाणाऱ्या मोपेडला धडक बसली. यामध्ये मोपेडस्वार महिला जखमी झाली. पुढे जावून ट्रकने समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिली.

तसेच जवळच उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक देवून तो थांबला. यामध्ये चारचाकी आणि मोपेडचे मोठे नुकसान झाले. आहे. या अपघातानंतर या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते.