कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दुरुस्ती आणि जतन करण्याकरीता केंद्र सरकार मोठा निधी देईल. प्रस्ताव पाठवून द्यावेत, असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी कोल्हापूर येथे केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार व अन्य प्रमुख उपस्थित होते..
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिली. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि दुरुस्तीसाठी १३.५२ कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरीची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, रांगणा पन्हाळा, विशाळगड पारगड किल्ला या ठिकाणचीही माहिती दिली गेली.