१५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

सांगली जिल्ह्यात यावर्षीदेखील ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व पंचायत समित्या आणि ६९६ ग्रामपंचायतींत अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही माहिती दिली. दि. १२ व १३ ऑगस्ट रोजी गावातून सायकल, दुचाकी, मोटारींवर तिरंगा लावून रॅली काढण्यात येणार आहे. तिरंग्याची शपथ घेतली जाणार आहे. शहीद जवान व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे.

१५ ऑगस्टरोजी मॅरेथॉन आयोजित केली आहे. तिरंगी झेंडे, टी शर्टचे स्टॉल लावून महिला बचत गटांना व्यवसाय उपलब्ध करून दिला जाणार आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान देशभक्तीपर गीतगायन, संगीताचे कार्यक्रम, ध्वजासोबत सेल्फी, असे उपक्रम होतील.

जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख, गट विकास अधिकारी यांच्यावर उपक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार
आहेत.