मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गूड न्यूज दिली आहे. ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, त्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये जुलैपासून 3 महिन्यांचे पैसे मिळतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत.
त्यामुळे आता 17 ऑगस्टला रक्षाबंधणापूर्वी देण्यात येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नाहीत, तरी ते पुढील टप्प्यात मिळणार आहेत. तसेच ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 रुपये एकत्र मिळतील. ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील, अशी खात्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.