मागच्या काही दिवसांपासून सबंध महाराष्ट्र ज्या लोकशाहीच्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज येऊन ठेपला आहे. आज म्हणजेच मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.निवडणूक आयोगाने माध्यमकर्मींना पत्रकार परिषदेचं निमंत्रण धाडलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा मंगळवारी जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून दुपारी साडेतीन वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.