Independence Day Special Recipe: स्वातंत्र्यदिनाला बनवा हे खास तिरंगी गोड पदार्थ……

दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. देशभरातील सर्व लोक एकत्र येऊन हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे प्रत्येक भारतीय 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करतो.यंदाचा स्वातंत्र्यदिन खास बनवायचा असेल तर घरीच तिरंग्याच्या रंगात गोड पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना खायला देऊ शकता. हे सर्व पदार्थ बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.

तिरंगा लाडू

स्वातंत्र्यदिनानिमित्त तिंरगी लाडू तयार करू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंगाचे लाडू बनवून एकत्र प्लेटमध्ये सर्व्ह करावे.त्यावर सुकामेवा किंवा पिस्ता टाकून सजावट करू शकता.

तिरंगा रोल

तुम्ही घरीच चवदार तिरंगा रोल बनवू शकता. यासाठी खोबऱ्या खिस, साखर आणि खाण्याचा रंगा वापरावा लागेल. हा तिरंगा रोल तयार झाल्यावर त्यावर सिल्व्हर वर्क लावू शकता. हे देखील चांगले दिसेल.

तिरंगा बर्फी

तिरंगा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हा मावा तयार करून तीन वेगळे बाग करायचे आहे. त्या तिन भागांमध्ये खाण्याचा हिरवा आणि केशरी रंग मिक्स करावा आणि एक पांढराच राहू द्या. हे भाग एकत्र करून बर्फी तयार करू शकता.