अशोक चव्हाण भाजपकडून लढवणार राज्यसभेची निवडणूक…..

सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागलेला पहायला मिळत आहे. जोरदार तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे.

आज दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना हे मोठं गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष घालवलेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, तसेच आमदारही त्यांच्यासोबत बाहेर पडले असून आज दुपारीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.अशोक चव्हाण यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर यांच्या समवेत नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांचा आज भाजप प्रदेश कार्यालय येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश होणार आहे.

तसेच नाशिक आणि औसा मधील पदाधिकाऱ्यांचासुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.