दिल्लीमधील लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा पार पडला. यावेळी पीएम मोदींनी जनतेला संबोधित केलंय. मोदींनी (PM Modi) आज ९४ मिनीटांपेक्षा जास्त वेळ भाषण केल्याचं समोर आलंय.यामध्ये दहा महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, हे आपण जाणून घेवू या.
१. १५०० हून अधिक कायदे रद्ददेशवासीयांच्या हितासाठी १५०० पेक्षा अधिक कायदे रद्द करण्यात आले. छोट्या छोट्या चुकांसाठी तुरुंगात टाकणारे कायदेही रद्द केले. फौजदारी कायदा बदलला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
२. प्रत्येक क्षेत्रात महिलांची ताकदप्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली ताकद दाखवून दिलीय. महिला आधारित विकासाच्या मॉडेलवर काम केलंय. इनोव्हेशन आणि उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगती करत आहेत. महिला फक्त सहभागच नाहीत, तर नेतृत्व देखील करत (PM Modi Independence Day Speech) आहेत. आपल्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि अंतराळ क्षेत्रामध्ये महिलांची ताकद दिसून येतेय. १० कोटी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत असल्याचं मोदींनी म्हटलंय.
३. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर विशेष भरबिहारमध्ये नालंदा विद्यापीठ सुरू झालंय. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर विशेष भर देण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नव्या शिक्षण नितीमुळे मातृभाषेला बळ मिळाल्याचं मोदी म्हणाले आहेत.
४. वन नेशन, वन इलेक्शनवन नेशन, वन इलेक्शनसाठी देशाला पुढे यावं लागेल. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करायचं आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Independence Day 2024) केलंय.
५. लवकरच देशभरात ६ जी लॉंच केलं जाणारदेशामध्ये लवकरच ६ जी लॉंच केलं जाईल, अशी घोषणा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलीय. ६ जी मिशन मोडवर काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय.
६. पुढच्या पाच वर्षांत मेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागामेडिकलच्या शिक्षणासाठी विद्यार्थी देशाबाहेर जात आहेत. त्यामुळे दहा वर्षांमध्ये मेडिकल जागांची संख्या वाढवली. सध्या संख्या एक लाख झालीय. पुढील पाच वर्षांत मेडिकल कॉलजमधील ७५ हजार नव्या जागा वाढवण्यात येणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
७. भारताचा संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयपंतप्रधान मोदी म्हणाले की, अगोदर आपण बाहेरुन शस्त्रे खरेदी करत होतो, त्यासाठी डिफेन्स बजेट वेगळं ठेवण्यात यायचं. आता आपण संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी होत आहोत. भारत संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत (Lal Killa) आहे.
८. २०३६ मध्ये ऑलिम्पिक भारतात व्हावंभारताने जी२० चे यशस्वी आयोजन केले. अनेक शहरात २०० पेक्षा जास्त इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. भारत देश मोठे इव्हेंट यशस्वी आयोजित करु शकतो, हे दाखवून दिलंय. त्यामुळे २०३६ मध्ये होत असलेले ऑलिम्पिकचे यजमानपद आपल्याला मिळावे, हे स्वप्न असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
९. जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपलं स्थानजगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपलं स्थान निश्चित झालं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
१०. संशोधनावर १ लाख कोटी रूपये खर्च करणारसंशोधन आणि नवोपक्रमावर १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचं वचन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय.