रविवारी पंढरपुरात मराठा वधू-वर परिचय मेळावा

प्रत्येकाची इच्छा असते कि आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा. परंतु मनासारखा जोडीदार मिळणे खूपच कठीण झालेले आहे. सध्या लग्नासाठी खूप सारे टेन्शन नातेवाईकांना येते. संत गाडगेबाबा महाराज मराठा धर्मशाळा, शुभकार्य वधू-वर सूचक मंडळ आणि महिला सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी गाडगे महाराज धर्मशाळेत मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापक अशोक माने यांनी दिली आहे.

हा महामेळावा रविवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या ठिकाणी उच्चशिक्षित, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, घटस्फोटित, विधवा, विधुर, प्रौढ अशा प्रकाराची स्थळे पाहावयास मिळणार आहेत. ५० हजारांहून अधिक स्थळे संकेतस्थळावरून पाहण्यास मिळणार आहेत. प्रत्यक्ष मुले-मुली दाखवून या ठिकाणी लग्ने जुळवली जाणार आहेत. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.