सांगोल्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी हरिभाऊ पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तहसील आणि पोलीस यांच्या संगमताने सांगोला तालुक्यामध्ये अनेक अवैद्य धंदे सुरू आहेत. त्याचप्रमाणे वाळू तस्करी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
यावर प्रशासन कोणतीही कारवाई देखील करत नाही. दररोज रात्री 400 ते 500 गाड्या या वाळू तस्करीच्या चालत राहतात. सांगोला तालुक्यात मटका, जुगार हे अवैध धंदे देखील जोरदार सुरू आहेत. सांगोला तालुक्यात या अवैधंद्यावरती कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे नियत्रंण नाही.
सांगोला तालुक्यातील वातावरण यामुळे खूपच बिघडत चाललेले आहे. महिला, मुली, लहान मुले यांच्यावर विपरीत याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी हरिभाऊ पाटील यांनी काल पंधरा ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे.