आटपाडी खानापूर तालुक्यांत आरोग्यसेवांना प्राधान्य

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागमार्फत आटपाडी तालुक्यात झरे व शेटफळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, बनपुरी येथे उपकेंद्र तसेच तासगाव तालुक्यातील पेड येथे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय उभारण्यासाठी शासकीय मंजूरी मिळाली. असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. बऱ्याच वर्षेची नागरिकांची मागणी होती. ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळणे आवश्यक होते. त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत सातत्यान पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी पायपेट करावी लागत होती.

रूग्णाचे हाल या भागात होत होते. याबाबत स्थानिक परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आटपाडी खानापूर विसापूर सर्कल विधानसभा तदारसंघातील झरे व शेटफळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बनपुरी येथे उपकेंद्र तसेच पेड येथे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णाय विशेष म्हणून मंजूर केल्याबद्दल आ. गोपीचंद पडळकर यांनी सह्यादी अतिथिगृह मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी आ. सदाभाऊ खान उपस्थित होते.