विट्यातील सर्व हॉस्पिटल उद्या राहणार बंद!

कलकत्ता येथील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी देशभरातून संताप्त पडसाद उमटू लागले आहेत. कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ विट्यातील वैद्यकीय क्षेत्रातील संघटना देखील चांगल्याच आक्रमक झाल्यात. या घटनेचा निषेध म्हणून परिसरातील सर्व हॉस्पिटल शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.

तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहे.विटा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. ए पवार यांनी याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च देखील काढण्यात येणार आहे.