रक्षाबंधनाअगोदरच सोन्यात मोठी वाढ, तर चांदीने मारली मुसंडी…

सणासुदीपूर्वी मौल्यवान धातूत दरवाढ होते हे समीकरण ठरलेले आहे. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. त्याचा फायदा बाजारपेठेला होतो. आता रक्षाबंधनापूर्वीच सोन्याचा तोरा वाढला आहे. तर चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. उद्या रक्षाबंधन आहे. त्याअगोदरच सोने आणि चांदी महागले आहे. कोणताही सण येण्यापूर्वी मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसते. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. ग्राहक थोडे जास्त पैसे गेले तरी काळजी करत नाहीत. तर काही जण बाजाराचा अंदाज घेऊन खरेदी करतात. काही ग्राहक सणासुदीपूर्वीच खरेदी करतात. ग्राहकांच्या खरेदी मूडवर बाजारपेठेला फायदा होतो. या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने जोरदार बॅटिंग केली आहे. या आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली. तर सोन्याच्या दरात पण वाढ झाली. 

या आठवड्याच्या अखेरीस सोन्यात दरवाढीचे सत्र दिसले. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 374 रुपयांनी महागले. बुधवारी त्यात 110 रुपयांची घसरण झाली. 16 ऑगस्टला 110 रुपये आणि 17 ऑगस्ट रोजी 115 रुपयांनी किंमत वधारली. या आठवड्यात सोन्यात 600 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात सोने वधारले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी 4,000 रुपयांनी वधारली. 14 ऑगस्ट रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्टला चांदीने 1 हजार रुपयांनी वधारली. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी चांदीत एक हजाराची वाढ झाली. तर 17 ऑगस्ट रोजी चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये आहे.