Stock Market: सुट्टीच्या दिवशीही करता येणार ट्रेडिंग पुन्हा उघडणार शेअर बाजार…

शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. शेअर बाजाराविषयी नवीन अपडेट समोर येत असून पुन्हा एकदा देशांतर्गत मार्केटमध्ये शनिवारी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. साधारणतः शनिवारी आणि रविवारी शेअर बाजाराला सुट्टी असते पण यावर्षी दुसऱ्यांदा शेअर बाजारात विशेष सत्र होणार आहे.नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) शनिवार १८ मे रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करणार असून एनएसईने जाहीर केले की १८ मे २०२४ रोजी म्हणजे शनिवारी सुट्टीच्या दिवशीही बाजार खुला राहील.

या कालावधीत दोन विशेष थेट व्यापार सत्रे होतील. डिझास्टर रिकव्हरी साइटची चाचणी घेण्यासाठी हे केले जात आहे.बाजारातील या विशेष सत्राअंतर्गत इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान मुख्य वेबसाइटवरून आपत्ती पुनर्प्राप्ती साइटवर स्विच केले जाईल, जेणेकरून मुख्य वेबसाइट ठप्प पडल्यास किंवा त्यात काही अडचण आल्यास या संकटाला तोंड देण्याची तयारी करता येईल.