जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.
मेष राशी
आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाईल. रक्षाबंधन असल्याने घरी उत्साहाचं वातावरण असेल. एकामागून एक बातम्या कानावर येऊन आदळतील. अर्थात आनंदाचे समाचार असतील. एखाद्या नव्या कामात रुची वाढेल. एखादं काम उद्यावर ढकलू नका. आजच करा. जुन्या चुका करू नका. धार्मिक कार्यात भाग घ्याल. दूरचा प्रवास संभवतो.
वृषभ राशी
नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत आज महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज खर्च वाढेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने एखादं थांबलेलं काम मार्गी लागेल. शेजाऱ्याच्या नादी लागू नका. जोडीदाराचे बोलणे ऐकावे लागेल. मनाने केलेल्या कामाचा फटका बसेल. आरोग्याची कुणकुण जाणवू शकते. बहिणीशी भेट होईल.
मिथुन राशी
आजचा दिवस सामान्य राहील. इच्छा नसताना कामावर जावं लागल्याने चिडचिड व्हाल. एखादं अडलेलं काम मार्गी लागेल. आजचा दिवस मौजमस्तीत घालवाल. राजकारणापासून अलिप्त राहा. आरोपप्रत्यारोपांपासून दूर राहा. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. बहिणीसाठी नवीन साडी खरेदी कराल. घरात आज गोडधोड बनवाल. गरजेच्या वस्तूंचीच खरेदी करा. नको त्या गोष्टीच्या खरेदीच्या फंदात पडू नका. व्यसन असेल तर सोडून द्या.
कर्क राशी
आजच्या दिवशी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आज बहिणीचे आशीर्वाद मिळतील. व्यापारात फायदा होईल. प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन व्यापाराला सुरुवात कराल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. कुटुंबातील वाद डोकेदुखी बनले. पण या वादापासून दूर राहा. कुणालाही मोठी रक्कम उधारीवर देऊ नका. नाही तर पैसे येण्याची शक्यता कमी राहील. निर्भयपणे मतं मांडा. कुणालाही घाबरू नका.
सिंह राशी
आयुष्यात नव्या व्यक्तीचं आगमन होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात दिलेल्या सूचनांचं स्वागत होईल. राजकारणात पाऊल टाकणाऱ्यांसाठी प्रगतीची दारे खुले होती. नव्या कोर्सला प्रवेश ग्याल. अचानक अनोळखी व्यक्तीशी ओळख होईल. या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडाल. विद्यार्थ्यांना अजून अभ्यास करण्याची संधी आहे. व्यवस्थित टाइमटेबल तयार करून अभ्यास केल्यास मोठं यश मिळावाल.
कन्या राशी
नवऱ्याचा सल्ला महागात पडेल. आर्थिक झळ पोहोचेल. त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. कामामध्ये धावपळ होईल. तुमचा अडकलेला पैसा आज मिळेल. बहिणीसाठी महागडी भेटवस्तू घ्याल. लग्न सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. अविवाहितांना चांगलं स्थळ येईल. गावाला जाण्याचा योग आहे. जुन्या चुका करू नका. कुणाबद्दलही गॉसिप करू नका. नाही तर बाराच्या भावात जाल. आज कुणी तरी ऑफिसमध्ये तुमची कळ लावण्याची शक्यता आहे.
तुळ राशी
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रगतीचे नवीन नवीन मार्ग उघडे होतील. घरात आज उत्साहाचं वातावरण असेल. घरात भरपूर मिठाई येईल. बहिणीच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण होईल. एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तर चांगला योग आहे. कुणालाही टाकून बोलू नका. नाही तर नात्यात कटुता येईल.
वृश्चिक राशी
आजचा दिवस बरा जाईल. पण मोठं काही घडणार नाही. घरी राहून कंटाळा येईल. बाहेर फिरायला जाण्याचा बेत अचानक रद्द होईल. आज बराच खर्च होणार आहे. जुने प्रश्न निकाली निघतील. कोणताही प्रश्न संवादाने सुटतो. संवाद साधून प्रश्न सोडवा. तुमचा एखादा मित्र घरी येऊ शकतो. मित्राच्या आगमनामुळे दिवस चांगला जाईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आज सोसायटीच्या मिटिंगला जाणं टाळा. घरातील साफसफाईत वेळ जाईल.
धनु राशी
आजचा दिवस चढ उताराचा आहे. आज ऑफिसमध्ये मिटिंग रद्द होईल. तुमची प्रकृती चांगली राहील. कुणाशी आर्थिक व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर विचार करूनच निर्णय घ्या. मानसिक तणावामुळे समस्या वाढतील. अधिक ताण घेतल्याने डोकेदुखी होईल. तुम्हाला झोपेचा प्रचंड त्रास आहे. हा त्रास आता कमी होण्याच्या मार्गावर आहे. मेडिटेशन केल्याने ताणतणाव दूर होतील. परदेशात गेलेल्या मित्राची भेट होईल.
मकर राशी
नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे थोडी अस्वस्थता वाटेल. नव्या ऑफिसबाबतच्या अनेक गोष्टी कानावर आल्याने भीती वाटेल. अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. जीवनसाथीचा सहयोग मिळेल. खरेदीमुळे बराच पैसा खर्च होईल. बऱ्याच काळापासून सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. अचानक दूरचा प्रवास करावा लागेल. संतान तुमच्या इच्छेविरोधात निर्णय घेईल.
कुंभ राशी
आजच्या दिवशी विचार करूनच कामे करा. कोणतंही काम करताना अधिक उतावीळपणा करू नका. निर्णय घेतानाही विचारपूर्वकच निर्णय घ्या. आज एखाद्या साधूपुरुषाशी भेट होईल. त्यामुळे मनाला प्रसन्न वाटेल. विपश्यन्ना करण्याकडे ओढ वाढेल. धार्मिक कार्यात लक्ष द्याल. आज एक मोठा मानसिक ताण दूर होईल. तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. जवळच्या नात्यातून दु:खद बातमी येईल.
मीन राशी
जुने विकार पुन्हा डोके वर काढतील. गॅसेसच्या त्रासाने हैराण व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस दगदगीचा जाईल. व्यापार, धंदा करणाऱ्यांना आज बरकतीचा दिवस असेल. अचानक नोकर कपात करावी लागेल. तुमचा बुडालेला पैसा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा फायद्याचा ठरेल. एखाद्या अंत्ययात्रेत समील व्हाल. घरी आज पाहुणे येतील. त्यामुळे खर्च वाढेल. नवीन कपडे खरेदी करावे लागणार आहेत.