मनसेकडून मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेच्या आयोजनावर संजय राऊत म्हणाले..

“काल नांदेडवरुन निघालो, सोलापुरात पोहोचलो. नांदेडपासून सोलापुरपर्यंत अनेक कार्यक्रम, मेळावे झाले. सोलापुरच म्हणालं, तर दक्षिण सोलापुरची तयारी पक्की आहे. दक्षिण सोलापुरची जागा अनेकदा शिवसेनेने जिंकलेली आहे. मविआत आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय. त्या चर्चेत दक्षिण सोलापुरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच चर्चा होईल. अनेक मतदारसंघात प्रत्येक पक्ष तयारी करतो. आमचे कार्यकर्ते, संभाव्य उमेदवारांना कामाला लागा असं सांगायला हरकत नाही. ही जागा मविआ जिंकेल. इथे शिवसेनेचा आमदार असावा अशी आमची इच्छा आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “राज्यातलं चित्र म्हणाल, तर काय चित्र आहे हे आपण जाणता. मुंबईतल्या पाच जागांवर महाविकास आघाडीतून एकाही पक्षाने दावा केलेला नाही या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “घाटकोपर, बोरिवलीच्या जागेबद्दल तुमच्याकडे चुकीची माहिती आली आहे. जेव्हा जागा वाटप जाहीर होईल, तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे हे सिद्ध होईल. कुठलीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही. प्रत्येक जागेवर आव्हान आहे. मुंबईच वातावरण मविआसाठी अनुकूल आहे. लोकसभेच चित्र विधानसभेतही दिसेल. मविआ जास्त जागा जिंकेल.”

मनसेने मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेच आयोजन केलय मध्यंतरी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेने ओळख निर्माण केलेली, आता मवाळ भूमिका घेतलीय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “मनसे सारख्या पक्षाला कोणत्या भूमिका असण्याचा कारण नाही. एखाद्या समाजासाठी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेची तयारी केली असेल, त्यात वाईट वाटण्याच कारण नाही. यात हिंदुत्व, इतर धर्माचा प्रश्न येतो कुठे? अजमेरला कोणाला जायचं असेल. त्याची व्यवस्था कोणी करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मनसेला सुबृद्धी सुचली त्यांचं स्वागत आहे” असं संजय राऊत बोलले.

भाजपाच्या विदर्भाबाबतच्या अंतर्गत सर्वेबद्दलही संजय राऊत बोलले. “महायुतीला विदर्भात 25 जागाही मिळणार नाहीत. भाजपाला फक्त 12 ते 13 जागा मिळतायत. आकाडा फुगवनू सांगितला आहे त्यांनी. सर्वात मोठा फटका नागपूर जिल्ह्यात बसणार आहे. फडणवीसांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांना निवडणूक सोपी नाही. विदर्भ मविआसाठी केकवॉक आहे” असं संजय राऊत म्हणाले.