इस्लामपुरात शनिवारपासून होणार अविष्कार कल्चरल ग्रुपचा संगीत महोत्सव…..

माजी मंत्री आमदार तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन इस्लामपूर मध्ये दरवर्षी केले जाते. तर माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार पासून अविष्कार कल्चरल ग्रुपचा संगीत महोत्सव सुरू होणार आहे.

हा महोत्सव शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी व रविवार 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. इस्लामपूर मध्ये या अविष्काराने 21 वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केलेली आहे आणि आपली एक वेगळीच छाप सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. जणू एक कौटुंबिक कलादालनच उभे केलेले आहे.

या संगीत महोत्सवामध्ये अनेक सिनेसृष्टीतील नायिका तसेच आघाडीची पार्श्वगायिका यांचा देखील सहभाग असणार आहे . तर शनिवारी आघाडीची पार्श्वगायिका असणाऱ्या पलक मुछाल व पलाश मुछाल यांचा दिल से दिल तक हा बहारदार हिंदी गीतांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे.

तर रविवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी बहारदार पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खास रसिकांच्या आग्रहास्तव रंगबाजी हा पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता होणार आहे याची माहिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिलेली आहे.

या लावण्यांच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांच्याच मनामध्ये घर करून असलेल्या अनेक लावण्यवती उपस्थित असणार आहेत.त्यामध्ये लावण्यवती मेघा घाडगे, माधवी निमकर, रूपाली भोसले, तेजा देवकर, स्मृती बडदे, ऐश्वर्या बडदे या लावण्यवतींच्या ठसकेबाज लावण्या होणार आहेत. अविष्कार कल्चर कडून अगदी या महोत्सवाचे आकर्षक आयोजन व सूत्रबद्ध नियोजन असते.

या संगीत महोत्सवास यशस्वी करण्यासाठी अविष्काराचे प्रमुख मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील, उपाध्यक्ष भूषण शहा, सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड, माजी अध्यक्ष सतीश पाटील, माजी सचिव प्रा. कृष्णा मंडले, नजीर शेख, संतोष पाटील, संजय पाटील, डॉ. अतुल मोरे, सचिन पाटील, हर्षवर्धन घोरपडे, श्रेयस पाटील, धनंजय भोसले, विशाल पाटील, विजय नाइकल, अनिल पाटील, अक्षय जाधव, प्रशांत पाटील, आप्पासो जावीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे.