आज १९ ऑगस्ट रक्षाबंधन सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधनाच्या सणाला आमदार भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राखी बांधली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देण्यात आली होती. त्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी भावना गवळी या दिल्ली असतांना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला.
आमदार भावना गवळी या म्हणाल्या… बहिण – भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा, याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दरवर्षीप्रमाणे यंदा रक्षाबंधनानिमित्त राखी बांधत मी रक्षाबंधन साजरा केला. मी भाऊ म्हणून मोदी यांना राखी बांधेतच, पण ते देशातील करोडे बहिणीचे देखील भाऊ आहेत. देशातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांबद्दल पहिल्यांदा विचार करणारे व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी यांचे आहे. मोदी या महिलांचे भाऊ आणि पिता देखील आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या जीवनात अनेक बदल झाले असल्याने ते आमचे भाऊ आहेत.