इस्लामपुरात १ सप्टेंबर रोजी श्रावण सोहळ्याचे आयोजन

इस्लामपूर सखी मंचने खास महिलांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन केले आहे. इस्लामपूरमध्ये महादेवनगर येथील निर्मला सांस्कृतिक हॉलमध्ये लोकमत सखी मंच, संजय पोतदार वशीकर सराफ आणि माहेर फॉर्मिंग ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १) दुपारी १ वाजता श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सर्वात भव्य लाडका सोहळा रंगेल. यामध्ये सोलो डान्स, सुगरण स्पर्धा (गोडमध्ये पुरणपोळी ताट, तिखटमध्ये थालीपीठ ताट), मंगळागौर खेळाच्या स्पर्धा आदींचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमास प्रथम येणाऱ्या ४०० सभासदांना चांदीच्या दुर्वा तर दुसऱ्या ४०० सभासदांना गोल्ड प्लेटेड खाऊचे पान देण्यात येईल. श्रावण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह देण्यात येईल. २९ ऑगस्टअखेर ग्रुपची आणि वैयक्तिक नावे संयोजिका प्रा. वैशाली पाटील यांच्याकडे नोंदवावीत. संपर्क : ८८३०५३५५९२