सांगोला शहर परिसरात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन तास मुसळधार पावसाने झोडपले तर रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. या पावसाने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना सोमवारी रात्री वादळी वारे व पावसाचा फटका बसला. या वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरगरवाडी, अनकढाळ, नाझरे आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागास शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली.
शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.सांगोल्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. शहरात दुपारी हलका तररात्री ८ वाजलेनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला.
दरम्यान अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.वादळी वारे व पावसामुळे सांगोला तालुक्यातील नाझरे, वझरे, सरगरवाडी परिसरात बागायती शेतीसह, जनावरांचे गोठे, राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव, तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.सांगोला तालुक्यातील सरगरवाडी येथे