सांगलीत अजित पवार गटाला मोठा धक्का! या पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा…

एकीकडे पक्षवाढ आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. मात्र, त्याचवेळी सांगली जिल्ह्यातून त्यांच्या पक्षाला भगदाड पडले आहे.
राज्य अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस प्रा. तोहीद मुजावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्याचे समर्थन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असून, राष्ट्रवादी हा त्यांच्यासोबत सत्तेत असल्यामुळे आपण या विधानाचे समर्थन करत नसून याचा निषेध करण्यासाठी राज्य अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस प्रा. तोहीद मुजावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रा. मुजावर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, “मी प्राध्यापक तोहीद इब्राहिम मुजावर सराचटणीस अल्पसंख्यांक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य. इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैंगबर यांच्यावर केले गेलेल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केल्याच्या निषेधार्थ मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”.
दरम्यान, महायुतीच्या या सरकारमधील आपण एक घटक पक्ष असून, अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांच्याच या कृत्याचे आपण समर्थन केल्यासारखे होईल व मला ते नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे.