बदलापूर प्रकरणातील मोठी अपडेट! 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूरातील शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं.