मंगळवेढ्यात पाण्यावरून लोकसभेवर पुन्हा बहिष्काराचा ठराव

आपल्या सर्वांना माहीतच आहे की सोलापूर जिल्हा हा दुष्काळ म्हणून ओळखला जातो या भागांमध्ये पाण्याची खूपच टंचाई आहे. दक्षिण भागातील शेतीच्या पाण्यावरून गेली अनेक वर्षे राजकीय व्यासपीठावरून सर्वच राजकीय पक्षांनी फसवणूक केल्यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुकीला मतदान नाही असा ठराव प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायतीत मांडण्यात आला.

दुष्काळाची तीव्रता या भागाला कायम जाणवत असते या भागातील पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे काही गावातील शेतकरी जमिनी सध्या कमी दरात सौर प्रकल्पाला विकून भूमीहीन होत आहेत. यामध्ये शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.