इस्लामपुरात ‘पीकविमा’व्यवस्थापकास मारहाण!

इस्लामपुरात पीकविमा पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख दिग्विजय पाटील यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चोप दिला. ही घटना मंगळवारी घडली. उरुण परिसरातील शेतकरी पांडुरंग हरी पाटील, लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचा १ रुपया भरून पीकविमा काढला होता.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले होते. यातील दोघांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार प्रहारच्या दिग्विजय पाटील यांच्याकडे आली होती. पाटील यांनी तालुका कृषी कार्यालयात येत पंचनामा पद्धतीबाबत घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे. पीकविमा पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याच्या लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिल्यास त्या पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवू, पैशाची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी
बंधनकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर पाटील यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पैशांच्या मागणीबाबत विचारणा केली. व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे देताच दिग्विजय पाटील यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावत रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.