वाळवा तालुक्यातील 93 निराधार प्रस्तावांना मंजुरी!

वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत तालुक्यातील निराधारांची 93 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या 93 व्यक्तींना शासनाकडून प्रति महिना दीड हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. तहसील कार्यालयातील सभागृहात समितीचे अध्यक्ष निवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार व्ही डी महाजन, पंचायत समिती, नगरपालिकेचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत 33 विधवा महिला, वीस दिव्यांग व्यक्ती, दोन अविवाहित, चार परितक्त्या, एक दुर्धर आजार, 31 श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील दोन अशा एकूण 93 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.