इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १४५ युवकांनी रक्तदान केले. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन संयोजक व युवकांचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामध्ये युवकांचा सहभाग मोलाचा असल्या ची भावना आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. येथील राजारामबापू ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सुभाषभाऊ सूर्यवंशी, डॉ. संग्राम पाटील, सचिन पाटील, दिग्विजय पाटील, अभिजीत कुर्लेकर, अभिजीत रासकर, किरण माने, प्रल्हाद माळी, विशाल सूर्यवंशी, पै. गुलाबराव पाटील उपस्थित होते. हेमंत पाटील, राहुल पुजारी, शामराव हिप्परगी, रमजान शेख, राजू हिप्परगी, अंकुश कराडे, सौरभ लाखे, श्रीकांत इच्चूर, योगेश खरात, अनिल माळी, नाजुद्दीन आगा,अजित शिंदे, सिद्धू कडकुळ, सिकंदर शेख, अमोल करांडे, जयहिंद गणेश मंडळाचे कार्यकत्यांनी रक्तदान शिबिरात मोलाचे योगदान केले.