इचलकरंजी महानगरपालिका कामगार कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी २२ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जुलै महिन्यामध्ये महानगरपालिकेला प्रलंबित मागण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण ही करण्यात आले होते. परंतु याबाबत जुलै रोजी महानगरपालिका
प्रशासनाने कोणताही निर्णय दिला नसल्याने सदरचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इचलकरंजी महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील सर्वच नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील कामगारांच्यावतीने जुलै महिन्यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा थकीत समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून हप्ता द्यावा, लाड कमिटीने केलेल्या शिफारसीची सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देवून अंमलबजावणी करावी, महागाई भत्त्यातील ही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कृती फरक द्यावा, पदोन्नतीसाठी कालबध्दतेचा नियम लागू करा आदी मागण्यासाठी कृती समितीच्यावतीने १५ जुलै आयुक्त यांना निवेदन दिले होते.
त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कृती समितीच्यावतीने २२ जुलै रोजी निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पूर परिस्थितीमुळे मोर्चा स्थगित केला होता. समितीने २२ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.