उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू इचलकरंजीसह परिसरात……

उद्या शुक्रवार म्हणजेच एक मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. इचलकरंजी व परिसरात १६ केंद्रावर ९ हजार ५७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ६.२४ टक्क्यांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दोन कस्टडीतून १६ केंद्रावर संपूर्ण नियंत्रण ठेवले जाणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून परीक्षा केंद्रे सज्ज झाली आहेत, अशी माहिती कस्टडी प्रमुख शिवाजी बोरचाटे, जहांगीर मुल्लाणी यांनी दिली.

कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम बसावा, यासाठी यंदाही ठोस पावले उचलली आहेत. प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्रांवर घेऊन येणाऱ्या ‘रनर’वर जबाबदारी दिली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि परीक्षेनंतर असे किमान पाच तास बैठे पथक नेमली आहेत. तसेच महसूल,पोलिस, शिक्षणाधिकारी, यांची विशेष पथके आहेत. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच वर्गात सोडण्याची सक्ती परीक्षा केंद्रांना आहे.