सांगोल्यातील तीन ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या आहेत. शेकापची गेली काही वर्षांपासून सुरू असलेली विजय घेडदौड कायम आहे. सांगोला तालुक्यामध्ये चिकमहूद, खवासपूर, वाढेगाव आणि सावे या चार ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) चुरशीने ८३.३७ टक्के मतदान झाले होते. चिकमहूद ग्रामपंचायत ही आमदार शहाजी पाटील यांचे गाव आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर पाटील यांनी सत्ता राखली असली तरी महूद ग्रामपंचायत सोडली तर इतर तीन ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपली सत्ता खेचून आणली आहे.
सांगोला तालुका ग्रामपंचायत सरपंच पद निकाल
शेकाप १( सावे)
शिवसेना शिंदे गट १ (चिकमहुद)
शेकाप – राष्ट्रवादी १ (खवासपूर)
शेकाप शिंदे गट १ (वाढेगाव)