भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. रेल्वेत तंत्रज्ञ पदांसाठी रिक्त पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. आता 5254 जागांवर भरती निघाली आहे. त्यामुळं आता आता एकूण 14298 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यापूर्वी जेव्हा ही भरती झाली तेव्हा RRB तंत्रज्ञ भरतीद्वारे एकूण 9144 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार होती. आता यामध्ये 5254 पदे वाढवण्यात आली आहेत.
अशा प्रकारे 14298 पदांसाठी नवीन भरती करण्यात येणार आहे. RRB च्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भातील नोटीस जारी करण्यात आली आहे. RRB ची सूचना पाहण्यासाठी, तुम्हाला रेल्वे भर्ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल ज्याचा पत्ता rrbapply..gov.in आहे.
निवड कशी होईल?
RRB तंत्रज्ञांच्या या पदांवरील निवडीसाठी, उमेदवारांना अनेक स्तरांच्या परीक्षा द्याव्या लागतील. सर्व प्रथम CBT संगणक आधारित असेल. त्याची तारीख अद्याप आलेली नाही, केवळ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती नोटीसमध्ये देण्यात आली आहे. याबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. जो पहिला टप्पा पार करेल तोच पुढच्या टप्प्यात जाईल आणि जो सर्व टप्पे पार करेल तोच अंतिम निवडला जाईल.
कोण करु शकतो अर्ज ?
अर्ज आणि पात्रता निकष समान आहेत आणि त्यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. ही माहिती तुम्ही नोटीसमधून मिळवू शकता. पगाराच्या बाबतीत, टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल पदांसाठी, उमेदवारांना लेव्हल 5 नुसार 29000 रुपये ते 92300 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.
दरम्यान, वाढीव रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी नवीन उमेदवारांसाठी लिंक पुन्हा उघडली जाईल, अशी माहिती नोटीसमध्ये देण्यात आली आहे. ही लिंक 15 दिवसांसाठी सक्रिय असणार आहे. ज्यामध्ये उमेदवार अर्ज करू शकतात. लिंक केव्हा उघडेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, सर्व उमेदवारांनी आरआरबीच्या वेबसाईटला भेट देत रहावे.
ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत ते त्यांचे प्राधान्य बदलू शकतात आणि इच्छित असल्यास बदल करू शकतात. याची लिंक 15 दिवसांसाठी RRB वेबसाइटवरही उपलब्ध करून दिली जाईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या झोनमध्ये आणि तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता.