हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विजय खेचून आणण्यासाठी अशोकराव माने यांची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष अगदी जोमाने कामाला लागलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगले राखीव मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्याचा घाट दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीचे चेअरमन व दलित मित्र अशोकराव माने यांनी घातला आहे.

निवडणुकीत मागे हटायचे नाही असा निर्धारही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यामुळे हा मतदारसंघ पिंजून काढण्यास माने यांनी सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघाचे माजी मंत्री, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी बरेच वर्षे प्रतिनिधित्व केलेले आहे. यानंतर राजू आवळे डॉ. सुजित मिणचेकर आणि आता आम. राजूबाबा आवळे प्रतिनिधित्व करत आहेत.