मुंबईत आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार?आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
तर ठाकरे गटाकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.