इचलकरंजी शहर व परिसरातील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गावभागातील हजरत सय्यद मख्तुम वली दर्गाह शरीफ उरुस सुरु झाला आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. उरुसा निमित्त सालाबादप्रमाणे रविवारी २५ रोजी दर्ग्यामध्ये मानाचा मंडप चढविला गेला आहे. बुधवारी २८ रोजी रात्री ९ वाजता संदल (गंधलेपन) करण्यात येणार आहे. गुरुवारी २९ रोजी भर ऊरूस असून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता उमर दराज चिस्ती यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी ३० रोजी हिंदू-मुस्लिम भाविकांचे (नैवेद्य) बरतन आहे, अशी माहिती उरुस कमिटीचे अध्यक्ष फिरोज मुजावर, उपाध्यक्ष सोहेल पटेल, खजिनदार तबरेज मुजावर, सेक्रेटरी फिरोज मुलाणी यांनी दिली. सर्व भाविकांनी उरुसातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरुस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Related Posts
महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात येणार अग्निशमन उपकरणे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्निशमन सेवांची उपकरणे बसविण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पाठवलेला…
काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान
अंबाबाईच्या कोल्हापूर भूमीत राहुल गांधी यांना आव्हान देतो की, त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम आणून दाखवावे. त्यांच्या पुढील चार पिढ्या…
आमदार प्रकाश आवाडे यांच निवडणुकीतून माघार घेण्यामागच कारण……
आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आपला विचार करावा, असा आग्रह इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे…