इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सुहास अशोकराव जांभळे यांच्यासह ५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात १३ उमेदवार उरले असून इचलकरंजीत महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे, महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे आणि अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर अखेरच्या दिवशी सुहास जांभळे यांच्यासह आरती माने, मुदस्सर समडोळे, प्रदीप कांबळे आणि इम्रान सनदी या अपक्षांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १३ उमेदवार उरले आहेत. माघारीनंतर सर्वच उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.
उमेदवार त्यांना मिळालेले चिन्हे पुढीलप्रमाणे : राहुल आवाडे – महायुती (कमळ), मदन कारंडे – महाविकास आघाडी (तुतारी वाजवणारा माणूस), विठ्ठल चोपडे – अपक्ष ( शिट्टी), अमर शिंदे – बहुजन समाज पार्टी (हत्ती), रवि गोंदकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), प्रशांत गंगावणे – देश जनहित पार्टी (शाळेचे दप्तर), , सचिन बेलेकर राष्ट्रीय समाज पक्ष (हिरा), शमशुद्दीन मोमीन – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), अभिषेक पाटील – अपक्ष ( बॅट), मदन येताळा कारंडे (अंगठी), रावसो निर्मळे – अपक्ष (लिफाफा), शाहूगोंडा सातगोंडा पाटील – अपक्ष ( प्रेशर कुकर ), सॅम उर्फ सचिन आठवले – अपक्ष (ट्रम्पेट).