इस्लामपूर येथे गुरुवार, दि. २९ रोजी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करावे, बांगलादेशातील पीडित हिंदूंना न्याय मिळावा, लवजिहाद विरोधात कठोर कायदा लागू करावा अशा मागण्यांसाठी सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर येथील यल्लमा चौकात होणाऱ्या सभेसाठी आमदार नितेश राणे, भरत आदमापुरे आणि हर्षाताई ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर यल्लमा चौकात सभा होईल. या सभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.